ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रस्ता मार्गिकेचे लोकार्पण..!

आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत रस्ता मार्गिकेचे लोकार्पण..!

प्रकाशन: 06 May 2022 07:57 PM
वाचन संख्या 113

मालवण एस टी स्टॅन्ड ते बौद्धवाडी जाणारी महत्वाची मार्गिका..

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : मालवण एस टी स्टॅन्ड ते मालवण बौद्धवाडी व पुढे खान मोहल्ला वायरी येथे जाऊन मिळणार्या महत्वाच्या रस्ता मार्गिकेचा आज सायंकाळी लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितितील या सोहळ्याला अनेक शिवसैनिक व स्थानिक नागरीक उपस्थित होते.

Article image


पेव्हर ब्लाॅक्सने बनलेली ही मार्गिका अत्यंत आकर्षक स्वरुपाची असून यावरुन आता स्टॅन्डच्या मागील परिसरातील ये जा सुकर होणार असल्याची समाधानाची प्रतिक्रिया उपस्थित स्थानिक नागरीकांनी दिली.

Article image

खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शन व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर आणि शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी या विशेष विकास कामाच्या निधीसाठी पाठपुरावा केला होता.

यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर,माजी बांधकाम सभापती नगरसेवक यतीन खोत, माजी बांधकाम सभापती व नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक नितीन वाळके, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे,माजी नगरसेवक पंकज सादये, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान अध्यक्ष व शिवप्रेमी समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,शिवसेना ज्येष्ठ नेते बबन शिंदे, पृथ्वीराज जोगी,किसन मांजरेकर,युवा सेना शहराध्यक्ष मंदार ओरसकर,मनोज मोंडकर,श्री.मराळ,सिद्धू जाधव, अन्य मान्यवर व अन्य स्थानिक नागरीक उपस्थित होते.

वर्दळीच्या वेळी चालत तसेच दुचाकीवरुन दक्षिण मालवणच्या वायरी व दांडी भागात जाणार्या अनेक नागरीकांसाठीही या मार्गिकेची सुधारित रचना अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 15
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 321

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स