नाबर प्रशालेची कु मधुरा जगदीश पाटील हिला रौप्यपदक..!
डॉ .होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री मंगेश रघुनाथ कामात चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या ‘व्ही एन नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीअम स्कूल, बांदा’ प्रशालेच्या कु मधुरा जगदिश पाटील (इयत्ता – नववी) हिने डॉ होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. प्राथमिक, द्वितीय व तृतीय फेरीत उल्लेखनीय यश संपादन करून अखेरच्या टप्प्यात मधुरा रौप्य पदकाची मानकरी ठरली.
तिच्या या यशाबद्दल तिची प्रशंसा होत आहे .
संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश कामत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक विद्यार्थी यांनी मधुराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)