खेमराज हायस्कुलच्या १९८४ /८५ सालच्या दहावी वर्गाचे स्नेहमेळावा माडखोल येथे..!
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल,बांदाच्या १९८४ -८५ सालच्या दहावी वर्गाचे विद्यार्थ्यांचे स्नेहमेळाव्याचे आयोजन शनिवारी ७ मे व ८ मे रोजी होणार आहे. ७ मे रोजी सकाळी १० वाजता एकत्र येणार आहेत.त्यानंतर प्रमोद सावंत यांच्या फार्म हाऊस,माडखोल येथे सलग दोन दिवस स्नेहमेळावा होणार आहे.
३७ वर्षांपूर्वीच्या सर्वत्र विखुरलेल्या आपल्या शालेय मित्रांना एकत्रित भेटण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्ताने माडखोल येथे सलग दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अनेक जुन्या आठवणीना उजाळा देण्यात येणार आहे. १९८४-८५ च्या वर्ग मित्रानी उपस्थित राहून कार्यक्रमास रंगत आणावी असे आवाहन शितल राऊळ, अजय महाजन यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)