तळगांव सोसायटी निवडणुकीत भाजपाची सरशी ; खासदार विनायकराव राऊत यांचा गांव.
भाजपतर्फे जल्लोष….!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बहुचर्चित आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या गावातल्या ‘तळगाव सोसायटीच्या’ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने महाविकास आघाडीचा
सात विरुध्द सहा असा पराभव केला.
चेअरमन पदी प्रकाश पावसकर तर व्हाईस चेअरमन राजेंद्र दळवी यांची निवड झाली. यावेळी संचालक चेतन मुसळे, प्रविण मोरजकर, महेश परब, समृद्धी कुशे, वर्षा वाळके तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, जगदीश चव्हाण,मालवण पं.स.सभापती अजिंक्य पाताडे, भाई राणे, चंद्रकांत पेडणेकर, सागर कुशे, उमेश राणे, देऊ कदम, राजु दळवी, स्वप्निल राणे, माधुरी बांदेकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हिर्लेकर यांनी काम पाहिले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)