ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
उद्या कोल्हापूर होणार काही सेकंद स्तब्ध….!

उद्या कोल्हापूर होणार काही सेकंद स्तब्ध….!

प्रकाशन: 05 May 2022 11:33 AM
वाचन संख्या 127

१०० सेकंद थांबणार सर्व व्यवहार व दळणवळण..

कोल्हापूर | ब्युरो न्यूज : ६ मे १९२२ दिवशी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाले होते. त्या दिनाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत.आणि या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध ठेवून त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे.
येत्या ६ मे रोजी सकाळी ठीक १० वाजता सारे कोल्हापूर १०० सेकंदासाठी स्तब्ध होणार आहे. ही स्तब्धता म्हणजे, राजश्री शाहू महाराजांना त्यांच्या १००व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार १०० सेकंद थांबून रस्त्यावर जिथे आहे तिथे दीड मिनिटे थांबून हे स्तब्धता रुपी वंदन प्रथमच साकारले जाणार आहे. या वंदन कार्यक्रमात केवळ शहरच नव्हे तर जिल्ह्यातील, राज्यातील, परदेशातील ज्यांना शाहू महाराजांची थोरवी माहिती आहे ते कोणीही त्यांच्यासाठी स्तब्ध राहून सहभागी होऊ शकणार आहेत.
या निमित्ताने शाहू महाराजांनी आपल्यासाठी किती काय काय करून ठेवले आहे. त्याचे स्मरण केले जावे. त्यांच्या या कार्याची स्मृती प्रत्येकाच्या मनात रुजावी हा यामागचा उद्देश आहे.
१ मे पासून स्तब्धते बाबत दररोज एफएम, रेडिओ, सर्ववृत्तवाहिन्या, चॅनलवरून सतत प्रसिद्धी दिली जाणार आहे. ६ मे सकाळी १० वाजता १०० सेकंदासाठी स्तब्धता आपल्या शाहू राजासाठी असे वारंवार घोषित केले जाणार आहे. तसेच शहरात आपत्कालीन सूचना देण्यासाठी ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्पीकर वरून बिगुल वाजवून पूर्वसूचना दिली जाणार आहे. या शिवाय सर्व उद्योग व्यवस्थापनातील सायरन, रुग्णवाहिका वरील सायरन १० वाजताच एका वेळी वाजविले जाणार आहेत. जेणेकरून आता आपण स्तब्धता पाळायची आहे याची जाणीव नागरिकांना करू दिली जाणार आहे. स्तब्धतेसाठी सर्व वाहतुकीची १०० सेकंदासाठी थांबावी यासाठी चौकाचौकात स्वयंसेवक उभे राहणार आहेत ते शिट्टी वाजवून स्तब्धता क्षणाची सर्व वाहनधारकांना जाणीव करून देणार आहेत.त्यामुळे सर्व वाहने आहे त्या जागी काही क्षण थांबणार आहेत. राजश्री शाहू महाराजांनी समाजकारण, कला, क्रीडा, शेती, उद्योग, व्यापार जल व्यवस्थापन या सर्व अंगाने सार्‍या देशाला अभिमान वाटेल असा कारभार केला आहे. किंबहुना कोल्हापूरसाठी त्यांनी अनेक योजना करून ठेवल्या आहेत. समाजकारणात तर शाहू महाराजांनी करून ठेवलेले कायदे आज ही मानवी हक्काचा पाया मानले जातात. त्यांचे निधन अवघ्या ४८ व्या वर्षी झाले २८ वर्षे त्यांनी राज्यकारभार केला आणि त्या कालावधीत पुढे पिढ्यानपिढ्या आदर्श घेता येईल असा राज्यकारभाराचा वास्तुपाठच घालून दिला. त्यामुळे त्यांच्या या कार्याला वंदन म्हणून शाहू स्मृती शताब्दी पर्व साजरे केले जात आहे आणि त्यातील स्तब्धता म्हणजे वंदन असणार असल्याचे समजते आहे.
ही वंदना शासकिय स्तरावरुन राबविली जात असल्याने कोल्हापुरात सध्या याची वेळोवेळी विविध ठिकाणी घोषणा केली जात आहे.

(फोटो सौजन्य: ब्राईट आर्मी महाराष्ट्र व कर्नाटक राज्य.)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स