प्रभू कुलविस्तार संस्थेचा १४ वा वर्धापन दिन संपन्न..!
मालोंड येथील श्री देव खारेश्वर महादेव मंदिरात साजरा झाला उत्सव.
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालोंड येथे प्रभू कुलविस्तार संस्थेचा १४ वा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. अक्षय्य तृतीयेच्या मुर्तावर श्री. देव खारेश्र्वर महादेव मंदिरात हा १४ वा वर्धापन दिन साजरा केला गेला.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी श्री.सदानंद मालाडकर यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता महादेवावर लघुरूद्र विधी करण्यात आला.
दुपारी १२ वाजता ब्राम्हण भोजन , ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा आणि तीर्थ प्रसाद व रात्री ८ वाजता स्थानिक भजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.
दुसऱ्या दिवशी सकाळी वर्धापनदिन सोहळ्याची सांगता झाली..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)