श्री कुलस्वामिनी भवानी माता त्रैवार्षिक गोंधळ उत्सवाचे आज खोत ग्रामस्थ मंडळाकडून आयोजन..!
नयनरम्य खोत जुवा वरची वाडी येथे साजरा होतोय उत्सव.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मौजे मसुरे खोत जुवा वरची वाडी येथे श्री कुलस्वामिनी भवानीमातेचा त्रैवार्षिक गोंधळचा भव्य धार्मिक उत्सव आज बुधवार दि. ४ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत खोत बांधव साजरा करत आहेत.
या निमित्ताने सोमवार दि.२ मे २०२२ रोजी सकाळी ९ वा. नवचंडी यज्ञ संपन्न झाला होता.
या आयोजनाचे निमंत्रक अध्यक्ष श्री गुरुनाथ कल्याण खोत (अध्यक्षः राष्ट्रीय कामगार सेना), चिटणीस श्री विलास विश्वनाथ खोत, खजिनदार : श्री प्रमोद सिताराम खोत, श्री सुधाकर लहू खोत व समस्त खोत बांधव व परिवार (वरची वाडी) आहेत.
आज साजरा होणार्या गोंधळ विधी कार्यक्रमाला श्री कुलस्वामिनी भवानीमाता खोत ग्रामस्थ मंडळ मौजे -मसुरे खोत जुवा (वरची वाडी )चे सल्लागार श्री. मुरलीधर लहू खोत, श्री. रामचंद्र गंगाराम खोत, श्री. विश्वास केशव खोत, श्री. शंकर मोरेश्वर खोत, श्री. साईप्रसाद तुळशीदास खोत, श्री. रुपेश विश्वास खोत यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे विनम्र आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)