ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
लोरेकर रावराणे कुटुंबियांच्या त्रैवार्षिक गोंधळाचे आयोजन...!

लोरेकर रावराणे कुटुंबियांच्या त्रैवार्षिक गोंधळाचे आयोजन...!

प्रकाशन: 04 May 2022 05:00 PM
वाचन संख्या 200

वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं.२ (गावठणवाडी) येथे प्रथेनुसार श्री भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ विधी कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.
समस्त लोरेकर रावराणे कुटुंबियांनी दि ६ मे २०२२ रोजी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहुन प्रसादाचा लाभ घेण्याचे विनम्र आवाहन केले आहे.

५ मे २०२२ सकाळी १०वाजता अभिषेक व शुध्दीकरण पुजा,
६ मे २०२२ सकाळी ९ वाजता भैरीपुजन, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता जोगवा, रात्रौ ८ वाजता महाप्रसाद रात्रौ १० वाजता, गोंधळाचा जागर ,७ मे २०२२सायंकाळी ४ वाजता रात्रौ ८ वाजता श्री सत्यनारायण महापुजा महाप्रसाद
रात्रौ ९ वा. सुस्वर भजने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रद्धाळू,भाविक व हितचिंतकांनी श्री भवानी मातेचे मंदिर, लोरे नं.२ (गावठणवाडी) येथे या सोहळ्याला उपस्थित रहायचे आवाहन समस्त लोरेकर रावराणे कुटुंबियांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स