ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांदा केंद्रशाळेत बासरी वादन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा केंद्रशाळेत बासरी वादन प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न..!

प्रकाशन: 03 May 2022 08:25 PM
वाचन संख्या 46

बांदा | राकेश परब : शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांच्या संकल्पनेतून एक दिवशीय प्रभागस्तरीय भारतीय संगीत वाद्यातील आद्य वाद्य असलेल्या बासरी वादनाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता.

Article image

सावंतवाडी येथील कला शिक्षक स्वप्निल गोरे यांनी हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले .या वासरी वादन कार्यशाळेला ३८ विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना बासरीचा इतिहास,बासरीची रचना व वादन करणे याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक स्वप्निल गोरे यांचा बांदा सरपंच अक्रम खान यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी केंदप्रमुख संदीप गवस,लक्ष्मीकांत ठाकूर,श्रदधा महाले मुख्याध्यापक श्रीकांत आजगांवकर , ग्रामपंचायत सदस्य राजेश विर्नोडकर आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना अक्रम खान यांनी पारंपारिक वाद्य असणारे बासरी या प्रशिक्षण वर्गाचे कौतुक करुन प्रत्येकाने किमान एक तरी छंद जोपासून त्यात नावलौकीक मिळवावा असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी दर्वा साळगांवकर यांनी केले सूत्रसंचालन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स