सिंधुदुर्गातील शेतकरी व कार्यकर्ते पुणे येथील आंदोलनात सहभागी होणार : भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत
चिंदर | विवेक परब : महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ऊस उत्पादक शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाल्याने भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेवनाना काळे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ५ मे २०२२ साखर आयुक्त पुणे कार्यालय यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. राज्य सरकार व साखर आयुक्त यांनी योग्य प्रकारे अतिरिक्त ऊसाचे नियोजन केले नसल्याने शेतक-यांच्या शेतात ऊस उभा आहे. कारखाने बंद करण्यात येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. यासंदर्भात योग्य पध्दतीने नियोजन करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे यांनी साखर आयुक्त पुणे यांचेकडे ४ एप्रिल २०२२ रोजी निवेदन देउन केली होती.
१५ एप्रिल २०२२ पर्यंत अतिरिक्त उसाच प्रश्न मार्गी लावण्याची मागणी ४ एप्रिल २०२२ रोजी दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती. सरकार व साखर आयुक्त यांनी अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावला नसल्याने साखर आयुक्त पुणे यांना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली दि.५ मे २०२२ पासुन साखर आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजेपासुन बेमुदत धरणे आंदोलन कार्यक्रम करण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी होणार असल्याचे भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी सांगितले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)