ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चाफेड बादेवाडी येथील श्री भैरी ठाणेश्वर भावई मंदिराचा ६ मे ते ९ मे रोजी जीर्णोद्धार सोहळा...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

चाफेड बादेवाडी येथील श्री भैरी ठाणेश्वर भावई मंदिराचा ६ मे ते ९ मे रोजी जीर्णोद्धार सोहळा...!

प्रकाशन: 03 May 2022 10:48 AM
वाचन संख्या 120

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील चाफेड बादेवाडी येथील श्री भैरी ठाणेश्वर भावई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा शुक्र. दि. ६ मे ते ९ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार ६ मे रोजी दुपारी २ वा. कलश व पाषाण मिरवणूक चाफेड भोगलेवाडी ते चाफेड बादेवाडी पर्यंत काढण्यात येणार आहे. शनि.७ मे रोजी स.७.३० ते १ वा. विविध धार्मिक कार्यक्रम, दु. १ ते ३ वा. महाप्रसाद,संध्या. ४ ते ६ वा. श्री भातवडेकर गुरुजी यांचे प्रवचन, ६ वा. श्रींची आरती, रात्रौ. ८ वा. विविध सांस्कृतिक करमणुकीचे कार्यक्रम,१० वा.स्थानिक भजने. रवि. दि.८ मे रोजी स.७ ते १ वा.विविध धार्मिक कार्यक्रम,शिखर कलश,पाषाण देवता प्रतिष्ठापना, दु.१ ते ३ वा.महाप्रसाद,संध्या.६ वा.श्रींची आरती, रात्रौ.९ ते १०.३० वा.दिंडी भजन श्री ठाणेश्वर प्रासादिक भजन मंडळ किंजवडे, रात्रौ. ११ वा. श्री चेंदवणकर गोरे (मालक सुधा दळवी) यांचे दशावतारी नाट्यप्रयोग.सोम. दि. ९ मे रोजी स. ८ वा. श्री देव महापुरुष लघुरुद्र,१० वा. श्री सत्यनारायण महापूजा,तीर्थप्रसाद, दु. १ ते ३ वा. महाप्रसाद,संध्या. ३ ते ५ वा.हळदीकुंकू समारंभ,६ वा. श्रींची आरती, रात्रौ. ९ ते १० वा.मान्यवरांचा सत्कार सोहळा,१० वा. बुवा अभिषेक शिरसाट ( हरकुळ बु.) आणि बुवा. समीर कदम ( पोखरण) यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे.तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री. भैरी ठाणेश्वर भावई विकास मंडळ आणि ग्रामस्थांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स