ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर

दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर

प्रकाशन: 20 Aug 2021 06:12 PM
वाचन संख्या 82

कणकवली | उमेश परब : कै. दिपलक्ष्मी दत्ताराम मडव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवार २१ ऑगस्ट रोजी वृंदावन हॉल, कणकवली येथे रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तरी १८ ते ४५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन अमेय मडव मित्रपरिवार यांनी केले आहे.

गेली ६-७ वर्षे रक्तदान क्षेत्रात काम करत असताना रक्ताची गरज ओळखून हे रक्तदान शिबिर आयोजित करीत असल्याचे रक्तमित्र अमेय मडव यांनी सांगितले. ज्यांची पहिली किंवा दुसरी कोव्हीड प्रतिबंधात्मक लस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत ते सुद्धा रक्तदान करू शकतात. त्यामुळे शासनाच्या कोव्हिडं प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे अमेय मडव मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स