ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणचे सुपुत्र सादीक इब्राहिमख़ान मुज़ावर पोलिस पदकाचे मानकरी..!

मालवणचे सुपुत्र सादीक इब्राहिमख़ान मुज़ावर पोलिस पदकाचे मानकरी..!

प्रकाशन: 30 Apr 2022 09:25 PM
वाचन संख्या 417

गुणवत्तापूर्ण व उल्लेखनीय कामगिरी बद्दल मिळालेला सन्मान..

मुंबई येथे पोलिस दलात अंमलदार पदावर सध्या सेवा बजावत आहेत सादीक इब्राहिमख़ान मुज़ावर.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहराचे सुपुत्र आणि सध्या मुंबई पोलिस दलात अंमलदार पदावर सेवा बजावत असलेल्या सादीक इब्राहिमख़ान मुज़ावर यांना शासनातर्फे पोलिस पदक सन्मान जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र पोलिस विभागातील विविध प्रवर्गात उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अधिकारी व अंमलदार यांना हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा पुरस्कार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन जाहीर होतो.

महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सादिक इब्राहिमख़ान मुज़ावर व अन्य पदकप्राप्त अधिकारी व अंमलदारांचे अधिकृत अभिनंदन केले आहे.

सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पोलिस सेवा पदक तथा पुरस्काराचे स्वरुप असून लवकरच तो प्रदान करण्यात येणार आहे.

पोलिस दलातील गुणवत्तापूर्ण उल्लेखनीय कामगिरी करुन सादीक इब्राहिमख़ान मुज़ावर यांनी त्यांच्या सेवेत सातत्यपूर्ण वाटचाल केली आहे
अंमलदार सादीक इब्राहिमख़ान मुज़ावर यांची मालवण शहर,सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई येथील सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स