ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा वनभोजन उपक्रम संपन्न.

भंडारी कनिष्ठ महाविद्यालयाचा वनभोजन उपक्रम संपन्न.

प्रकाशन: 29 Apr 2022 08:00 PM
वाचन संख्या 243

वनभोजन उपक्रमात किनारा स्वच्छतेचाही समावेश.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या भंडारी कनिष्ठ महाविद्यालय तथा ज्युनीअर काॅलेजचा वनभोजन उपक्रम प्रकल्प धुरिवाडा कुरण येथे संपन्न झाला.

गेली दीड दोन वर्षे कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण पद्धती अवलंबिण्यात आल्याने शैक्षणिक वाटचालीत काही समाजशिल सुदृढतेचे सांस्कृतिक उपक्रम टाळावे लागले होते. मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाले आहे आणि त्यामुळे शैक्षणिक उपक्रमातीलच एक चैतन्यदायी वनभोजनाचा कार्यक्रम प्रकल्प म्हणून संपन्न झाल्याचे कनिष्ठ महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.

धुरिवाडा कुरण इथल्या या कार्यक्रमात उच्च माध्यमीक विद्यालयातील मुलांनी वनभोजनातील भोजन या प्रक्रियेपूर्वी समुद्र किनारा स्वच्छता केली. नंतर गाणी भेंड्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमातही विद्यार्थी वर्ग सहभागी झाला.


स्वावलंबन,एकात्मता, व्यक्तिमत्व सक्षमीकरण,पर्यावरण, सांस्कृतीक सादरीकरण, इव्हेंट मॅनेजमेंटची , समूह व समाज जबाबदारी तोंड ओळख असे विविध स्तर विद्यार्थी विद्यार्थिनींनी अनुभवले.
भंडारी एज्युकेशन सोसायटी उच्च माध्यमीक प्राध्यापक वर्ग ,भंडारी हायस्कूल शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचार्यांनी आखलेल्या आणि सृजनशीलतेने राबविलेल्या या वनभोजनाच्या प्रकल्पाविषयी उच्च माध्यमीक महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री.बांदेकर यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने माध्यमांशी संवाद साधला.

या उपक्रमाला प्राचार्य श्री. वामन खोत , प्राध्यापक श्री. पवन बांदेकर सर, प्राध्यापक श्री. अजित परुळेकर , प्राध्यापक श्री. जी. टी. दळवी , प्राध्यापक श्री. स्नेहल पराडकर , प्राध्यापक श्री. गणेश सावंत , प्राध्यापक श्री. जितेंद्र गावडे , प्राध्यापक श्री. देवेंद्र चव्हाण , प्राध्यापक वैभवी वाक्कर, प्राध्यापक अदिती शेर्लेकर यांचे योगदान व उपस्थिती होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 304

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स