ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
छत्रपतींच्या ऐतिहासिक मूक वास्तूंना बोलके करणारे आश्चर्य म्हणजे डाॅ.बाबासाहेब पुरंदरे : सौ.ज्योती तोरसकर बुवा

छत्रपतींच्या ऐतिहासिक मूक वास्तूंना बोलके करणारे आश्चर्य म्हणजे डाॅ.बाबासाहेब पुरंदरे : सौ.ज्योती तोरसकर बुवा

प्रकाशन: 28 Apr 2022 08:27 PM
वाचन संख्या 81

टोपीवाला हायस्कूलच्या ‘सेंट्रल हाॅल’ मध्ये साप्ताहिक विवेकचा ‘शिवॠषी व शिवसृष्टी’ विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रम संपन्न..!

कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री संजय जोशी तर डाॅ सुभाष दिघे आणि ॲड समीर गवाणकर होते प्रमुख अतिथी.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात साप्ताहिक विवेक प्रकाशित ‘शिवऋषी आणि शिवसृष्टी’ विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजीत करण्यात आला.

Article image
Article image


मालवण शहरातील टोपीवाला हायस्कूलमधील वैभवशाली शैक्षणिक परंपरा असलेल्या ‘सेंट्रल हाॅल’ तथा मध्यवर्ती सभागृहात हा प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमात साप्ताहिक विवेकच्या शिवऋषी आणि शिवसृष्टी’ विशेष अंकाचे प्रकाशन टोपीवाला प्रशालेच्या शिक्षिका आणि किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या उपाध्यक्षा व इतिहास,गड किल्ले अभ्यासक ज्योती तोरसकर बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय जोशी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. डाॅ.सुभाष मधुकर दिघे आणि ॲड.समीर गवाणकर हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते.

Article image
श्री संजय जोशी ( मुख्याध्यापक,टोपिवाला हायस्कूल मालवण)
Article image
सौ.ज्योती तोरसकर बुवा ( शिक्षिका व उपाध्यक्षा किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती)

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.रत्नाकर कोळंबकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साप्ताहिक विवेकचे जिल्हा प्रतिनिधी श्री विवेक मुतालिक यांनी केले. यामध्ये त्यांनी छत्रपतींच्या तत्व घटकांबद्दल बोलताना विशेष अंकाच्या विविध उद्देशांना थोडक्यात स्पष्ट केले.
यानंतर श्री.मंदार माईणकर यांनी छत्रपती,इतिहास, या विषयावर उपस्थितांना माहिती दिली.

यानंतर औपचारिक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. विशेष अंकाचे प्रकाशन झाल्यानंतर प्रमुख अतिथी व विशेषांक उद्घाटक सौ.ज्योती तोरसकर बुवा यांनी उपस्थितांना संबोधीत केले.
सौ.ज्योती तोरसकर बुवा यांनी दिवंगत डाॅ बाबासाहेब पुरंदरेंच्या बालपणापासूनच्या जीवन चरित्राचा थोडक्यात आढावा घेतला.
बाबासाहेब पुरंदरे यांना जाणवलेले छत्रपती व त्यांनी उभारलेल्या भव्य वास्तू ह्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या आधीही सर्वांना आस्थेने ठाऊक होत्याच परंतु त्यांना सर्वसामान्यांपर्यंत बोलकेपणाने पोहोचवायची किमया बाबासाहेबपुरंदरे यांनी केली असे त्यांनी सांगितले. शिवकालीन गड व किल्ले रकण,संवर्धन व जतन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहेच शिवाय दिलेला शब्द व दिलेली वेळ आणि इतर जीवनमूल्यांसाठी छत्रपतींचे आदर्श जीवन अभ्यासणे हे विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साप्ताहिक विवेक प्रकाशीत या विशेष अंकाच्या किंमतीतील 25 रुपये हे बाबासाहेब पुरंदरे यांनी आखलेल्या शिवसृष्टीसाठी योगदान स्वरुपात दिले जाणार आहे. ही शिवसृष्टी अख्ख्या जगाला व बाल,युवा वर्गाला एक इतिहासाचे आनंदाने अभ्यास करायचे भव्य पुस्तकच असल्याचे ज्योती तोरसकर यांनी सांगून त्यांनी उपस्थितांना हा विशेषांक जास्तीतजास्त शाळा,विद्यार्थी व शिक्षकांपर्यंत पोहोचवायचे आवाहन केले.

या सोहळ्याला टोपीवाला हायस्कूलमधील विद्यार्थिनी,विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच प्रशालेच्या अनुभवी शिक्षिका सौ.तिनईकर व अनुभवी शिक्षक श्री डि.एस.खानोलकर , श्री. मणेरीकर,श्री.वारंग ,श्री.गोसावी,श्री. बि.जी.सामंत व इतर महनीय शिक्षकगण उपस्थित होते.
स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री गीरसागर,श्री पणशीकर ,श्री.गजानन मालंडकर व मालवणमधील अन्य मान्यवर शिव अभ्यासक व साप्ताहिक विवेकचे सभासद यावेळी उपस्थित होते.
श्री रत्नाकर कोळंबकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व अध्यक्ष,प्रमुख अतिथी व उपस्थितांचे आभार मानले.

या विशेष अंकाविषयी कोणालाही काही माहिती हवी असल्यास साप्ताहिक विवेकचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रतिनिधी विवेक मुतालिक यांच्याशी 9422381378 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स