चाफेड भोगलेवाडी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..!
शिरगाव |संतोष साळसकर : नॅब कम्युनिटी आय केअर सेंटर मिरज संचलित, विवेकानंद नेत्रालय कणकवली आणि गायगोठन गणपती मंदिर देवस्थान चाफेड भोगलेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गणेश मंदिरात मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.या शिबिराचा पंचक्रोशीतील बहुसंख्य लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
या शिबिराच्या सुरवातीला गायगोठण गणपती मंदिर देवस्थान चे अध्यक्ष पंढरीनाथ कांडर यांनी या शिबिराचे नेत्र तपासणी तज्ञ संदीप कदम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी देवस्थान समिती चे उपाध्यक्ष महेश भोगले,सेक्रेटरी सत्यवान भोगले,खजिनदार सत्यवान कांडर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुनील कांडर,पोलीस पाटील संतोष सावंत, माजी सरपंच संतोष साळसकर,ज्ञानदेव भोगले,जयश्री साळसकर,वासुदेव परब,सखाराम वायंगणकर,उमेश परब,अनिल परब,सुमित्रा भोगले आदींसह ग्रामस्थ,लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)