आचरेत साहित्य भूषण चंद्रशेखर हडप यांचे कथाकथन.
चिंदर | विवेक परब : जागतिक पुस्तकदिन आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे यांचा स्नेह मेळवा यांचे औचित्य साधून क्रांती स्मृती डी.एड काॅलेज साताराचे सेवानिवृत्त प्राध्यापक साहित्यभूषण चंद्रशेखर हडप यांचे ज्येष्ठ नागरिकांसाठी कथाकथन झाले. त्यानी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या़ची शेलारशाखिंड..,बेलभंडार.. तुळशीबाग आदी कथा कथन केल्या. साहित्यातील बाळ कोल्हटकर.. आचार्य अत्रे यांचे काही किस्से कथन केले. ज्येष्ठ नागरिकानी आपली संध्याछाया आनंदीत जाण्यासाठी कथाकथन, कथावाचन हे छंद लावून घेतले पाहीजेत असे ते म्हणाले. बहुसंख्य जेष्ठांनी ह्या कथाकथनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाला बाबाजी भिसळे, अशोक कांबळी, सुधीर शिवेश्वरकर, श्रीकांत सांबारी, लक्ष्मण आचरेकर, सुरेश गावकर, जकारीन फर्नाडीस, सुरेश ठाकूर, ब्रांजेल फर्नांडीस, अरुंधती कांबळी, प्रकाश पुजा आदी जेष्ठनागरिक सेवासंघाच्या पदाधिकारी सोबत पंचक्रोशितील बहुसंख्य मनोयुवा उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)