ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
महावितरणाची पठाणी वसुली सुरु असल्याचा भाजपाचा आरोप..!

महावितरणाची पठाणी वसुली सुरु असल्याचा भाजपाचा आरोप..!

प्रकाशन: 24 Apr 2022 01:00 PM
वाचन संख्या 124

सिक्युरिटी डिपाॅझीट बिलांची होळी करणार : जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई.

चिंदर | विवेक परब : महावितरणने मार्च महिन्याच्या बिलासोबत स्वतंत्र डिपाॅझीटची बीले पाठविल्याने ग्राहकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे . व्याज व ग्राहकांच्या फायद्याचे गणित सांगुन महावितरण कोट्यावधी रुपये ग्राहकांच्या खिशातून काढण्याचा कट रचला आहे . या अवास्तव बिलामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे . कारण यापूर्वी कोरोनाच्या काळात २०० युनीट मोफत विज देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती . त्यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिलात सवलत मिळेल या भाभड्या आशेने बील भरण्यास उशीर केला , आणि त्यानंतर उर्जामंत्र्यांनी घुमजाव केले . या सर्व गुंतागुंतीत बील रक्कम वाढली .तरीही ग्राहकांनी टप्प्याटप्प्याने व्याजासह बीले भरली . कोरोनाच्या काळात ऑनलाईन बिले भरण्याच्या महावितरणच्या आवाहनाही ग्राहकांनी साथ दिली . काहींनी व्याजासह रक्कम भरून वीजपुरवठा सुरळीत ठेवला .

परंतु आता महावितरणने कोळशाचा अपुरा पुरवठा असल्याचे कारण देत ग्रामीण भागात भारनियमनाला सुरुवात केली . त्यातच जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार म्हणजे सिक्युरीटी डिपाॅझीटची स्वतंत्र बिले पाठवली आहेत. आधीच हातात पुरेसा रोजगार नाही , अनेकांचे उद्योग मोडकळीस आलेले असताना , काहींनी स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न करत असताना तुट भरून काढण्यासाठी महावितरण सिक्युरीटी डिपाॅझीटचा नवा फंडा काढला आहे . ही बीले नुकतीच शहरात महावितरणने पाठवली आहेत . दोन्हीही बीले एकाचवेळी आल्याने ही अतिरिक्त रक्कम ग्राहकांनी भरु नये असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे .

एकीकडे लाईट बिल भरणे, लाईट बील वसुली यात सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल असताना , तसेच वीजचोरीही सिंधुदुर्गात नसताना लोडशेडिंग करणे म्हणजेच सिंधुदुर्ग वासीयांवर अन्याय आहे. म्हणुनच या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा च्या वतीने डिपाॅझीट बिलांची होळी करणार असल्याचे भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सांगितले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स