ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आम्हाला महेश कांदळगांवकरांचा अभिमान आहे : खासदार विनायकराव राऊत.

आम्हाला महेश कांदळगांवकरांचा अभिमान आहे : खासदार विनायकराव राऊत.

प्रकाशन: 23 Apr 2022 05:23 PM
वाचन संख्या 308

समाजकारणातून राजकारण केलेले कांदळगांवकर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेत असेही प्रतिपादन.

खासदार राऊत व आमदार वैभव नाईक यांची कांदळगांवकर यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट…!

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

तत्पूर्वी दुपारी 11:30 वाजता आमदार वैभव नाईक यांनी प्रथम शिवसेना शाखा मालवण येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी विविध विकास कामांबद्दल चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन केले.


यावेळी तिथे युवा सेना शहर अध्यक्ष मंदार ओरसकर ,तपस्वी मयेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक महेश जावकर, किरण वाळके, नरेश हुले , माजी नगरसेवक पंकज सादये, संजय कासवकर ,प्रसाद आडवणकर, पृथ्वीराज जोगी,सन्मेष परब व पत्रकार उपस्थित होते.

यानंतर खासदार विनायक राऊत यांचे आगमन झाल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या समवेत मालवण शहराचे माजी नगराध्यक्ष व नुकतेच पक्षत्याग केलेले नेते महेश कांदळगांवकर यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेत चर्चा केली.

यावेळच्या चर्चेनंतर खासदार राऊत यांनी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या कार्यपद्धतीची विशेष प्रशंसा करुन ते आपल्या शिवसेना पक्षातील अत्यंत स्वच्छ व चांगली प्रतिमा असलेले शहराचे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन केले.
महेश कांदळगांवकर यांना कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसूनही ते सामाजिक मार्गाने जी राजकीय वाटचाल करत आले आहेत त्याची खासदार राऊत यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. पक्षाचे संघटनात्मक धोरण कोणी खिळखिळे करत असल्यास ते सहन केले जाणार नसून आम्ही आमदार खासदार व संपूर्ण शिवसेना महेश कांदळगावकर यांच्या पाठीशी ठामपणाने उभी असल्याचेही खासदार राऊत यांनी सांगितले. आगामी शहर निवडणूका त्यांच्या व अन्य सहकारी पदाधिकारी यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार असून मालवण शहर कार्यकारणीतही फेरबदल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी तिथे आमदार वैभव नाईक, माजी नगरसेवक मंदार केणी, माजी नगरसेवक दर्शना कासवकर, माजी नगरसेवक नितीन वाळके , किरण वाळके,तपस्वी मयेकर, माजी नगरसेवक महेश जावकर, भाई कासवकर व इतर नेते, मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स