ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
प्रशिक्षण केंद्र राजसी कॉम्पुटर एज्युकेशनचे बक्षिस वितरण...!

प्रशिक्षण केंद्र राजसी कॉम्पुटर एज्युकेशनचे बक्षिस वितरण...!

प्रकाशन: 23 Apr 2022 01:55 PM
वाचन संख्या 231

पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न.

चिंदर | विवेक परब : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच MKCL यांचे अधिकृत प्रशिक्षण केंद्र राजसी कॉम्पुटर एज्युकेशन श्रावण यांच्यामार्फत ५ वी ते ९ च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी MOM ही परीक्षा शालेय अभ्यासक्रमावर आधारित online पद्धतीने घेण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातील MKCL च्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रावर ही परीक्षा घेतली गेली. या परिक्षेसाठी राजसी कॉम्पुटर एज्युकेशन येथे स्थानिक विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद देऊन चांगले यशही मिळवले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इ. ५ वी मधून कु. सोहम नारायण राऊत यांनी प्रथम पारितोषिक पटकावले . तसेच इ. ६ वी मधुन कु. तन्मय सुनिल राऊत हा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. इ सातवी मधून कु. वेदांत उल्हास सावंत व वेदांत रामप्रसाद पळसंबकर हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे राजसी कॉम्पुटर एज्युकेशनतर्फेही अभिनंदन करण्यात आले.

Article image
Article image

या स्पर्धेचे बक्षिस वितरण सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, अंगणवाडी सेविका निकिता पुजारे, राजसी कॉम्पुटर संचालक सौ. माधवी परब, अनुजा राऊत, वृषाली पुजारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या बक्षिस वितरणानंतर पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक शालेय विद्यार्थी वर्ग हा संगणक व तंत्रज्ञानात प्रगती करत आहेत हे कौतुकास्पद आहे. राजसी काॅम्प्युटर एज्युकेशन सेंटर सारख्या तंत्र शैक्षणिक संस्था ग्रामीण भागात त्यांचे काम करुन सरकारच्या विविध प्रकल्पांना चांगले सहकार्य करत आहेत ही गोष्ट उल्लेखनीय आहे.

Article image

यात यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांना पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स