विजयश्री उर्फ प्रेमा तांडेल कालवश...!
स्थानिक व्यावसायिक सक्षमतेचा दीपस्तंभ गमावल्याची सर्व स्तरांतून प्रतिक्रिया.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या प्रसिद्ध मत्स्य उद्योजिका श्रीमती विजयश्री उर्फ प्रेमा भगवान तांडेल (84) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी रात्री उशिरा निधन झाले. तांडेल यांनी मस्य विक्रीतून आपल्या कुटुंबाला भक्कम आधार निर्माण केलं होता. त्यांच्यावर शनिवारी सकाळी शोकाकुल वातावरणात सर्जेकोट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. श्री भद्रकाली मत्स्य व्यवसाय सोसायटी चेअरमन कृष्णानाथ तांडेल, मत्स्य उद्योजक गोपीनाथ तांडेल यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)