ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मी लोंबत्या लोकांबद्दल बोलत नाही : आमदार नितेश राणे.

मी लोंबत्या लोकांबद्दल बोलत नाही : आमदार नितेश राणे.

प्रकाशन: 22 Apr 2022 06:38 PM
वाचन संख्या 257

लोडशेडिंगचे संकट हे नियोजनशून्य महाविकास आघाडी सरकार निर्मित..

कणकवलीतील पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांची टीका

कणकवली | बंटी राणे : महाराष्ट्र राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षाच्या राजवटीत पुन्हा वीज टंचाई सुरु झाली आहे. सत्तेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी म्हणजे लोडशेडिंग हे ठरलेले आहे .नियोजन शून्य कारभारामुळे हे होत आहे.लोडशेडिंगबाबत विचारणा केल्यावर केंद्रावर बोट दाखवतात,हे निर्लज्जपणा सारखे वागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रावणाप्रमाणे १० पालकमंत्री आहेत.पालकमंत्री उदय सामंत आहेत कुठे?लोडशेडिंग नियोजन नाही.किरण सामंत अधिकाऱ्यांना फोन करताहेत.लोडशेडिंगचे संकट महाविकास आघाडी सरकार निर्मित असल्याचा घणाघाती आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

लोडशेडिंगबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदाहरण पाहिल्यास फिडर प्रमाणे होत असले तरी नियोजन असते,तर वेगळी परिस्थिती असती.महाविकास आघाडीचे सरकार संकटाची पूर्व तयारी करत नाहीत.कोरोनात देखील नियोजन नसल्याने राज्यात धोका निर्माण झाला होता.राज्य सरकारचा कोणत्याही संकटात एककलमी कार्यक्रम फक्त केंद्राकडे बोट दाखवले जात आहे,ही दुर्दैवी असल्याचा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आता कुठे पर्यटन व्यापार उठत आहे.जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या अडचणीत व्यापारी आहेत.पर्यटन मंत्री म्याव म्याव करून जिल्ह्यात येऊन गेले.लोडशेडिंगमुळे पर्यटक कसे थांबणार ?याचे उत्तर पर्यटन मंत्री,पालकमंत्री व सत्ताधारी आमदारांनी दिले पाहिजे.पर्यटनाचे पट्टे आहेत,त्यांना वीज नसेल तर काय उपयोग?सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्पेशल केस का नाही?इथे विजेचे जास्त नियोजन का होत नाही.राज्यातील पर्यटन वाढवायचे असेल तर सरकारने वेगळे नियोजन करावे.राज्यातील मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे.पैसे खाऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करीत आहेत.सरकारचा चेहरा लोकांसमोर ठेवला आहे.केंद्रामुळे लोडशेडिंग होत नाही.राज्याने नियोजन केले नसल्यामुळे सरकार निर्माण हे संकट आहे.आता राज्य सरकार वीज खरेदीच्या मूडमध्ये येत आहे,तेव्हा भ्रष्टाचार होतो, हे कोरोना काळातील झालेल्या घोटाळ्यानुसारच झोल होईल.वीज खरेदीत घोटाळा झाल्यास उद्या पेंनड्रॉईव्ह निघतील,असा टोला आ.नितेश राणे यांनी लगावला.

जिल्ह्यात वीज लोडशेडिंग काळात पत्रकार कर्तव्य बजावत असताना ३५३ गुन्हे दाखल होत असतील त्याविरुद्ध आवाज उठवणार आहोत.हा माध्यमाचा आवाज दाबण्याचा करण्याचा प्रयत्न करत आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री नाही तर काही नेते पालकमंत्री समजत आहेत.१० पालकमंत्री असल्याने अधिकाऱ्यांना फोन करत आहेत.पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात पाट फिरवली आहे.कोरोना पुन्हा वाढत आहे,बूस्टर डोस किती लोकांनी घेतला आहे,जास्तीत जास्त लोकांना देण्यासाठी नियोजन केले पाहिजे.नाहीतर अधिकृत किरण सामंत यांना पालकमंत्री बनवा.अधिकाऱ्यांना फोन त्यांचेच येत आहेत,असा चिमटा शिवसेनेला आ.नितेश राणे यांनी काढला आहे.

अमोल मिटकरी पैसे दिले की पाहिजे ते बोलतात,हे अनुभव आहेत. राऊतही तसेच आहेत.ब्राम्हण समाजाबद्दल मिटकरी यांची भूमिका होती की राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका होती हे प्रथम जाहीर करावे नंतर माफी मागून उपयोग नाही.
अमोल मिटकरी हे अधिकृत आमदार आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसची ही भूमिका आहे. त्यांच्या मानधनचा चेक कोणी काढला हे पाहायला हवे.

संजय राऊत या प्राण्याबद्दल बोलून वेळ वाया घालवू नये आणि लोंबत्या लोकांबद्दल मी बोलत नाही.जर अपक्ष आमदार व खासदार शिवसेनेला आव्हान देत आहे तर आता तिच तर लायकी राहिलेली आहे असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

(फोटो : संग्रहीत)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स