पोलिसांचा नागरिकांसाठी सुरक्षा व सावधानतेचा इशारा..!
कुर्ली,शिराळे,सडूरे, अरूळे,निम अरुळे,खांबाळे,आचिर्णे,सांगुळवाडी,नावळे या गावांसह वैभववाडी परिसरातील सर्वांनीच सावध रहायचे केले आवाहन.
वैभववाडी | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे वैभववाडी
यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काल दिनांक 21 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सुमारे १० अनोळखी व्यक्ती खांबाळे दारये मार्गे अरुळे गावाच्या दिशेने आलेल्या आहेत. हे सर्व हिंदी बोलत असून सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. शिवाय त्यांच्याकडे शस्त्रं असण्याचीही शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी वैभववाडी व तरळे येथे एका दरोडेखोर गॅंग ने दरोडे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकांनी रात्री जागता पहारा करून स्वतः सह कुटुंबाची काळजी घ्यावी. शक्य असल्यास सर्वांनी एकत्र राहून या व्यक्तींवर पाळत ठेवावी. रात्री कोणी दरवाजा ठोठावल्यास दरवाजा उघडू नये. शिवाय रिकाम्या हाताने त्यांना प्रतिकार करण्यास जाऊ नये. गावात संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास वैभववाडी पोलीस स्टेशनच्या 02367237133 या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)