व्यंकटेश ठाकूर यांचे निधन...!
मसुरे डांगमोडेतील एक ‘नवतरुण मित्र’ हरपल्याने हळहळ.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे डांगमोडे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, व्यवसायिक व्यंकटेश नारायण ठाकूर ४८ वर्षे यांचे गुरुवारी रात्री उपचारादरम्यान कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता डांगमोडे येथील स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. व्यंकटेश याच्या निधनाने गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नवतरुण मित्र मंडळ डांगमोडेचे ते सृजनशील कार्यकर्ते होते. गावच्या कला क्रीडा धार्मिक क्षेत्रामध्ये व्यंकटेश याचा मोठा वाटा असायचा. गावातील कोणतीही माहिती एका क्षणात सर्वांना देण्याचा त्यांचा एक हात खंडा होता. पायाने अपंग असूनही प्रत्येकाच्या सुखदुःखात व्यंकटेश धावून जात होता. धार्मिक क्षेत्राचा त्याचा गाढा अभ्यास होता. सर्वांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. मनमिळावू, परोपकारी वृत्ती चा असा त्याचा स्वभाव होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ, भावजय, बहीण, भावोजी,पुतणे, पुतणी, असा मोठा परिवार असून सामाजिक कार्यकर्ते बाळा ठाकूर, गुरूनाथ ठाकूर यांचे ते भाऊ होतं.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)