जि.प.प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी शाळेचे सुयश ; बि.डी.एस तथा ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षा निकाल...!
शिक्षक संभाजी पवार व शिक्षक यशवंत पाटील यांची होतेय विशेष प्रशंसा..!
चिंदर | विवेक परब : मागील फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या BDS परीक्षेत जि. प. पू. प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी ता.मालवण या शाळेतील मुलांनी उत्तम यश संपादन केले. शाळेच्या १००% निकालासह २ विद्यार्थ्यांची गोल्ड मेडलसाठी निवड झाली आहे.
त्यात कु.स्वप्नाली नागेश विरकर इयत्ता १ ली १०० पैकी ९३ गुण मिळवत गोल्ड मेडलसाठी निवड, कु.सायली नागेश विरकर इयत्ता ४ थी १०० पैकी ९७ गुण मिळवत गोल्ड मेडलसाठी निवड झाली.
या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक यशवंत पाटील व संभाजी पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे विस्तार अधिकारी उदय दीक्षित, केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, माजी सभापती पं.स.मालवण धोंडू चिंदरकर साहेब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. श्रद्धा सुर्वे, उपाध्यक्ष प्रमोद सुर्वे, ग्रामपंचायत चिंदरचे उपसरपंच दिपक सुर्वे, उद्योजक प्रकाश मेस्त्री, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर आदींसह पालक, ग्रामस्थ यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)