ओझर विद्यामंदिरचा हीरक महोत्सवी सोहळा २३ पासून..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग ह्या प्रशालेचा हीरक महोत्सवी सोहळा २३ एप्रिल २०२२ रोजी दुपारी तीन वाजता ओझर विद्यामंदिर च्या भव्य सभागृहात संपन्न होणार आहे. या प्रसंगी उद्घाटक म्हणून खासदार श्री.विनायक राऊत, स्वागताध्यक्ष मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू तथा माजी विद्यार्थी डॉ सुहास पेडणेकर, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री गजानन कीर्तिकर, आमदार वैभव नाईक, उद्योजक डॉ. दीपक परब, कांदळगाव सरपंच सौ. उमदी परब, हडी सरपंच श्री. महेश मांजरेकर, रेवंडी सरपंच सौ प्रिया कांबळी व तोंडवळी तळाशिल सरपंच श्री. आबा कांदळकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यानिमित्त सायंकाळी ६ वाजता पालक, आजी माजी विद्यार्थी पंचक्रोशीतील प्राथमिक शाळा यांचा विविध गुणवर्णनपर कार्यक्रम, माजी विद्यार्थ्यांचा दशावतार गदापर्व आणि रेवंडी येथील पालकांची धम्माल विनोदी एकांकिका मिराबाई नॉट आउट सादर होणार आहे. २४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आजी माजी विद्यार्थ्यांचा नृत्य आणि सदाबहार गाण्यांचा बहारदार कार्यक्रम ‘ऑर्केस्ट्रा ओझर’ होणार आहे. तरी या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शेखर राणे, चिटणीस जी. एस. परब, शालेय समिती अध्यक्ष किशोर नरे आणि मुख्याध्यापक पी.आर खोत यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)