श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात अक्षय तृतीयेला सत्यनारायण महापूजा.!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील श्री विठ्ठल रखुमाई देवालयात मंगळवार दिनांक ०३ एप्रिलला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सत्यनारायण महापुजा आयोजित करण्यात आली आहे.
या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे विनम्र आवाहन श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडी यांनी केले आहे.
श्री विठ्ठल रखुमाई देवालय ट्रस्ट, पळसंब वरचीवाडी येथे ही पूजा संपन्न होईल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)