ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तळाशील वाडिला मंजूर केलेल्या बंधाऱ्याच्या कामाला झाली सुरूवात
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तळाशील वाडिला मंजूर केलेल्या बंधाऱ्याच्या कामाला झाली सुरूवात

प्रकाशन: 19 Aug 2021 07:32 PM
वाचन संख्या 97

खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने कामाला सुरवात

मालवण । वैभव माणगावकर : तळाशील गावासाठी आमदार वैभव नाईक यांनी मंजूर करून घेतलेल्या ५४ लाखाच्या दोन धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला आज गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे. तळाशील गावात तातडीने बंधारा बांधण्याचा शब्द आ. वैभव नाईक यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले होते. या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला सुरुवात झाल्याने आ. वैभव नाईक यांनी तळाशील ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला आहे.
तळाशील गावातील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते. आमदार वैभव नाईक यांनी खा.विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून तातडीने धूपप्रतिबंधक बंधारे मंजूर करून घेत उपोषण स्थळी भेट देऊन धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याचे काम शुक्रवार पासून सुरु करण्याचा शब्द ग्रामस्थांना दिला होता.त्यांच्यावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले होते. आ. वैभव नाईक व शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मच्छीमार नेते बाबी जोगी, सरपंच आबा कांदळकर, विभाग प्रमुख समीर लब्दे यांनी तळाशील ग्रामस्थांना धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचा दिलेला शब्द पाळला असून एक दिवस अगोदरच धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामाला आज गुरुवार पासून सुरुवात करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स