देंदोनवाडी प्रकल्पाच्या ५६ कोटी निधीच्या कामाचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते भूमिपूजन…!
बरीच वर्षे रखडलेल्या प्रकल्प पूर्णत्वास जात असल्याने कळसुली प्रकल्पग्रस्तांनी मानले राज्य सरकारचे आभार .!
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील ‘कळसुली देंदोनवाडी’ प्रकल्पांतर्गत ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या ५६ कोटी निधीतील प्रस्तावित विविध विकास कामांचे भूमिपूजन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
मागील चार महिन्यांपूर्वी कळसुली पुनर्वसनमधील प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांची प्रलंबित कामे पुर्ण करु असे आश्वासन खासदारांनी पुनर्वसन क्षेत्रातील ग्रामस्थांना दिले होते.
कळसुली प्रकल्पाचे पर्यायी मार्ग,रस्ते दुरुस्ती,कॅनॉल बांधणे,धरण दुरुस्ती करणे,पाणी पुरवठा करणे अशा विविध उर्वरीत विकास कामांच्या पुर्णत्वासाठी सुरुवात करण्यात झाली आहे. विकास कामांतर्गत मंजूर रस्ता कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना खासदारांनी योग्य ते बदल करण्याच्या सूचना दिल्या.पुनर्वसन मधील पाणी टंचाई वर लवकरच तोडगा काढणार असल्याची माहिती खासदार राऊत यांनी दिली.
कळसुली पुनर्वसन मधील समस्या राज्य सरकार पूर्णत्वास नेत असल्याने ग्रामस्थांमधून आभार व्यक्त केले जात आहेत.
यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते,माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतिश सावंत, संदेश पारकर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन सावंत, सुशांत नाईक,राजू राठोड, अतुल दळवी,चंदू परब, सुशांत दळवी, सहदेव नाईक, दिगंबर सुतार, संतोष सुतार, संतोष मुरकर, बळीराम राणे,दिनकर दळवी,मधू चव्हाण,कांता दळवी,राजू राऊत, चंद्रकांत दळवी, दिगंबर नाईक, रामचंद्र नाईक,श्री काणेकर,रवी घोगळे, तसेच प्रकल्प अधिकारी श्री.हिरेगौडर, श्री.रुपेश राणे सह पुनर्वसन मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)