ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दशावतारी कलाकार सुदृढपणे जगला तरच दशावतार कला जिवंत राहील : सहदेव धर्णे.

दशावतारी कलाकार सुदृढपणे जगला तरच दशावतार कला जिवंत राहील : सहदेव धर्णे.

प्रकाशन: 19 Apr 2022 11:51 AM
वाचन संख्या 205

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबई येथे कोकण भूमिपुत्रांसाठी कार्यरत असलेल्या
श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्था आयोजित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृतीचे काम सुरु असते.
या प्रकल्पाचे तथा श्री सोमेश्वर कलामंच व गराजलो रे गराजलोचे मुंबईस्थित अध्यक्ष श्री सहदेव धर्णे यांनी सामाजिक मंचावरुन सर्वांशी संवाद साधला.
हे चळवळीचे कार्य करता करता या चळवळी अंतर्गतच वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
त्यासाठी संस्था आता नविन पण अत्यावश्यक मुद्द्यांवर काम करणार असल्याचे अध्यक्ष श्री सहदेव धर्णे यांनी स्पष्ट केले.

संस्थेतर्फे गेल्या वर्षी दशावतारी कलाकारांचा आणि दशावतारी मंडळांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कलाकार जगला तर कला जिवंत राहील. आता पुढील अत्यावश्यक उपक्रम म्हणून दशावतारी कलाकारांच्या आरोग्याविषयी आरोग्य शिबीर राबविण्यात येणार आहे.भविष्याचा विचार करून यापुढे दशावतारी कलाकारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यांची आर्थिक स्थिती चांगली झाली होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असणार आहे. दशावतारी नाट्यप्रयोग सादर करताना ध्वनी यंत्रणेसारख्या समस्येमुळे कलाकारांच्या आवाजावर परिणाम होतो.यावर तोडगा काढण्यासाठी.
लवकरच दशावतारी जाहीर मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
कोकणातील दशावतारी व मुंबईतीलही इतर कोकणाशी निगडीत कलावंतांच्या उज्वल भविष्यासाठी आपण निःस्वार्थीपणे कार्य करत राहणार असल्याचा पुनरुच्चार श्री सोमेश्वर कलामंचचे अध्यक्ष श्री सहदेव धर्णे यांनी केला आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स