ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
विलवडे शाळेत पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी अभियान...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

विलवडे शाळेत पहिलीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारी अभियान...!

प्रकाशन: 17 Apr 2022 07:03 PM
वाचन संख्या 51

बांदा | राकेश परब : नव्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा पूर्व तयारी अभियान राबविणे हा उपक्रम स्तुत्य आहे. बौध्दिक,शारीरिक व भावनिक,गणना,भाषा या बाबत विद्यार्थ्यांची तयारी किती आहे याची माहिती घेऊन पालकांनी घेणे गरजेचे आहे.या मेळाव्यात अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने विविध कॄतीखेळ घेतल्याने दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून येणार आहे. यासाठी मुलं, पालक व शिक्षकांनी या शासनाच्या उपक्रमाचा लाभ घ्याण्याचे आवाहन विलवडे गावचे सुपुत्र व मुंबई येथील एस.आर.दळवी फाउंडेशन चे व्यवस्थापकीय विश्वस्त रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी केले आहे. यावेळी दळवी यांनी शाळेला साउंड सिस्टिम भेट देण्याचे जाहीर केले. तसेच शाळेला आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषद शाळा विलवडे नं. २ प्रशालेत ‘शाळा पूर्व तयारी’ मेळावा उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दळवी बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर सीता दळवी, माजी सरपंच मोहन दळवी,विस्तार अधिकारी दुर्वा साळगांवकर,केंद्रप्रमुख संदीप गवस,विशेषतञ स्वप्निल राऊळ,विषयतज्ज्ञ प्रसाद सांगेलकर,माजी उपसभापती कृष्णा सावंत,सामाजिक कार्यकर्ते सोनु दळवी,व्यवस्थापन अध्यक्ष रश्मी सावंत,माजी उपसरपंच प्रकाश दळवी,प्राजक्ता दळवी,पूर्वा दळवी,आशिका सावंत,विश्वास सावंत,भालचंद्र गवस,महेद्र सावंत,संजय सावंत उपस्थित होते.

Article image


मुख्याध्य‍ापक सुरेश काळे व शिक्षक सचिन शेळके यानी योग्य नियोजन केले. विलवडे मळावाडी व टेंबवाडी तील आजी-माजी पाल्यासह पालकांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 453

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स