<em>पानवळ बांदा येथे गँस पाईपलाईनचे काम सरपंच व ग्रामस्थांनी रोखले..!</em>
बांदा | राकेश परब : सध्या बांदा शहरातून जमीन खोदाई करून गॅस पाईपलाईनचे काम जोरात सुरु आहे. तसेच गॅस पाईपलाईन चे खोद काम डेगवे गावातून बांदा सिमेवर पानवळ भागात रस्त्याच्या बाजुला करण्यात येत आहे.सदर गोष्ट समजताच बांद्यातील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी जात सदर काम रोखले.
कंपनीच्या ठेकेदार व मुकादम यांना जाग्यावर बोलवून खडे बोल सुनावण्यात आले . ज्या रस्त्यासाठी सतत ६ वर्ष कितीतरी आंदोलने ,उपोषणे केली होती. असे असताना रस्त्याचे काम होऊन अजून एक महिना सुद्धा झालेला नसताना चांगला रस्ता खणून साईड पट्टी खराब करून येत्या पावसामध्ये सामान्य जनतेचे हाल करण्याचे या मागचा हेतू आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला. जो पर्यंत ज्या विभागाकडून सदरील कामास परवानगी दिलेली आहे त्या विभागाचे वरीष्ठ अधिकारी जाग्यावर येत नाहीत तो पर्यंत हे काम करण्यास आमचा विरोध असेल . असे यावेळी उपस्थित असलेल्यांनी संबंधीत विभाग प्रमुख यांना सांगण्यात आले.
यावेळी ज्ञानेश्वर सावंत , बाबा गाड ,अक्रम खान, बाळू मोर्ये , आनंद सावंत , पप्पू कदम उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)