ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
"थांब ठेकेदारा थांब…!"
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

"थांब ठेकेदारा थांब…!"

प्रकाशन: 17 Apr 2022 01:46 PM
वाचन संख्या 219

हळवल शिवडाव रस्त्याबाबत ग्रामस्थांनी उचलले पाऊल..!

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात ‘मुख्यमंत्री सडक योजना’ अंतर्गत हळवल ते शिवडाव मार्गाचे सुमारे २२लाखाचे काम अत्यंत सुमार दर्जाचे असल्याचा आरोप करुन हळवल ग्रामस्थांनी रस्त्याचे काम रोखले. रस्त्याला लागणाऱ्या डांबराचे प्रमाण अत्यल्प असल्याने रस्त्यावर टाकलेली खडी हाताने निघत असल्याने ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली.
हळवल परबवाडी ते शिवडावपर्यंत जाणाऱ्या मार्गाची दुर्दशा झाली होती.

Article image
Article image

अनेक प्रयत्नानंतर या मार्गासाठी सुमारे २२ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत प्राप्त झाला होता. दोन दिवसांपूर्वी या मार्गाचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम करत असताना डांबर कमी प्रमाणात वापरण्यात येत असल्याचे हळवल ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

या मार्गावरून हळवल शिवडाव तसेच कनेडी येथे जाणारे अनेक ग्रामस्थ ये जा करत असतात रहदारीचा रस्ता असल्याने तो सुस्थितीत असावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. मात्र काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थांनी अभियंता व ठेकेदार येत नाहीत तोवर काम बंद ठेवण्याचा इशारा कामगारांना दिला. यावर संबंधीत ठेकेदार व बांधकाम अभियंता यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. व काम चांगल्या प्रतीचे करून देऊ असे आश्वासन दिले त्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले. यावेळी हळवल सरपंच दीपक गुरव, उपसरपंच अरुण राऊळ, सुभाष परब, सुजाता परब, वामन परब, दीपक राऊळ, किरण राऊळ, दीपेश परब, अनिकेत परब, मधुकर पाडावे, प्रकाश पवार, हर्षल परब, करण गावडे, ऋषी गावडे, संतोष परब, विराज परब, ऋषी राऊळ, मिथुन लाड, सुहास लाड, सचिन परब, भरत गावडे, सतीश गावडे, रोहन राणे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स