ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दी स्काॅलर ऑफ कणकवली २०२२ गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन २० एप्रिल रोजी…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दी स्काॅलर ऑफ कणकवली २०२२ गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन २० एप्रिल रोजी…!

प्रकाशन: 17 Apr 2022 11:01 AM
वाचन संख्या 214

शिरगांव | संतोष साळसकर : अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गच्या वतीने दी स्काँलर ऑफ सिंधुदुर्ग ॲवॉर्ड २०२२ पूर्व उच्च प्राथमिक (५वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले होते. कणकवली शाखेच्यावतीने या सराव परीक्षेतील कणकवली तालुकास्तरीय टाॅप टेन विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम बुधवार दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी दुपारी ३.३० वा.केंद्रशाळा कणकवली नं.१ (तालुकास्कूल कणकवली) येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

Article image

या कार्यक्रमात अश्मित शैलेश मुळीक-शाळा-कळसुली भोगनाथ.-२५८ गुण२, वेदिका संतोष माने-शाळा-लोरे नं १. -२४२गुण, पूजा विठोबा मेस्त्री-शाळा-दिगवळे नं१-२४२ गुण , वरद उदय बाक्रे-शाळा कणकवली नं.३-२३८ गुण, प्रांजल चंद्रकांत ओवळकर-शाळा-नरडवे महंमदवाडी-२३२गुण, प्रथमेश प्रकाश पवार-शाळा कणकवली नं.२-२३० गुण, सोहम संतोष लोकरे -शाळा -खारेपाटण नं.१-२१४ गुण , सोहम शामराव बिरादार-शाळा तळेरे नं.१-२१२ गुण , सान्वी संदीप देसाई-शाळा-दिगवळे बामणदे-२०६ गुण, अथर्व अजय सावंत-शाळा कणकवली नं.२-२०२ गुण , मुग्धा रामचंद्र देसाई-शाळा कळसुली गवसवाडी-२०२ गुण , संजिवनी पुंडलिक सावंत-शाळा भिरवंडे नं.१ -२०० गुण या गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षक प्रतिक्षा तावडे,दिनेश जाधव,योगिता माळी,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, विस्तार अधिकारी सुहास पाताडे यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

या गुणगौरव सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक मान.अरूण चव्हाण,गटशिक्षणाधिकारी मान.किशोर गवस,संघटनेचे राज्यसल्लागार मान.प्रकाशभाई दळवी,तालुका सल्लागार मान.चंद्रकांत तेली,विस्तार अधिकारी मान.कैलास राऊत,मान.सुहास पाताडे,जिल्हा महिलासेल अध्यक्षा मान.संजना ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या गुणगौरव सोहळ्यासाठी गुणवंत विदयार्थी ,त्यांचे पालक ,शिक्षक व संघटना पदाधिकारी आणि सभासद यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष शंकर बागवे व सरचिटणीस संतोष देसाई यांनी केले आहे.

Article image

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स