धनगर समाज संस्थेकडून माजी तालुका अध्यक्ष कै. संतोष चौगुले कुटुंबियांच्या तातडीची मदत..!
वैभववाडी | नवलराज काळे : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातल्या वनगुळे येथील पोलीस पाटील व रत्नागिरी जिल्हा धनगर समाज संस्थेचे माजी लांजा तालुका अध्यक्ष संतोष चौगुले यांचे नुकतेच अकाली निधन झाले होते.
तरुण वयात धडाडीचा कार्यकर्ता हरपला त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी संस्थेच्या पदाधिकारी यांनी त्यांच्या कुंटुबियांनी तातडीची मदत म्हणून आज १००००/- रुपयांची मदत त्यांच्या पत्नी श्रीमती श्रुती चौगुले ,मुलगी सानवी व मुलगा सागर यांच्याकडे सुपुर्द केली .
यावेळी वनगुळे सरपंच श्री. प्रभाकर गुरव ,ग्रामस्थ श्री. शांताराम पळसमकर संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे, राजापूर तालुका अध्यक्ष प्रकाश झोरे ,राजापूर तालुका कार्याध्यक्ष वसंत झोरे ,लांजा उपाध्यक्ष राजेश झोरे, वनगुळे शाळा नं.१चे शिक्षक श्री. बाळू नागरगोजे,ग्रामस्थ प्रकाश गाडे ,श्रीमती भोजे आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)