ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
इंधनाचा तुटवडा ठरतोय वाहन चालकांची गैरसोय…!

इंधनाचा तुटवडा ठरतोय वाहन चालकांची गैरसोय…!

प्रकाशन: 16 Apr 2022 06:33 PM
वाचन संख्या 102

कणकवली | बंटी राणे : कणकवली पोलिस स्टेशन नजिक पोलिस कल्याण निधी अंतर्गत सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंप इंधन तुटवड्यामुळे वारंवार बंद ठेवण्यात येत असल्याने वाहन चालकांची फारच मोठी गैरसोय होत आहे. यामध्ये कणकवली पोलिस निरीक्षक यांनी तातडीने लक्ष घालून नियमित आणि सुरळीत पेट्रोल डिझेल पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कणकवली-आचरा मार्गावरील मोक्याच्या ठिकाणी आणि कणकवली पोलिस स्टेशनच्या नजिकच पोलिस कल्याण निधी अंतर्गत पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेला आहे.त्यामुळे वाहन चालकांची तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांची पेट्रोल डिझेलसाठी चांगली सोय झाली होती.त्यामुळे वाहनांची सतत वर्दळ सुरू असते.मात्र अलिकडे या पेट्रोल पंपांवरती नियमित पेट्रोल डिझेल पुरवठा वेळेत होत नसल्यामुळे वारंवार पेट्रोल डिझेल पुरवठ्या अभावी पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येत असल्याने वाहन चालकांची गैरसोय होई लागली आहे.

कणकवली शहरातील इतर पेट्रोल पंचांच्या तुलनेत कणकवली पोलिस स्टेशन नजिक पोलिस कल्याण निधी अंतर्गत सुरू करण्यात आलेला पेट्रोल पंपावरती लहान मोठ्या वाहनांची पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणावरती गर्दी असते.वारंवार इंधन पुरवठा वेळच्या वेळी होत नसल्यामुळे वारंवार पेट्रोल पंप बंद असल्यामुळे वाहनचालकांची फार मोठी गैरसोय होत असल्याने याकामी आपण स्वत:हून वेळीच लक्ष घालून सदर पेट्रोल पंपावरती नियमित आणि सुरळीत पेट्रोल डिझेल उपलब्ध होईल यादृष्टीने उपाययोजना करण्यात यावी.तसेच जिल्हा पोलिस अधिक्षक राजेंद्र दाभाडे यांनी देखील या गोष्टीची तातडीने दखल घ्यावी अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर यांनी कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्याकडे दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधून केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स