ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
त्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : हिंदू जनजागरण समिती.

त्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : हिंदू जनजागरण समिती.

प्रकाशन: 15 Apr 2022 08:44 PM
वाचन संख्या 237

रामनवमी मिरवणुकांमधील दगडफेक प्रकरण…!

कणकवली | बंटी राणे : देशभरात उत्साहात पार पडलेल्या श्रीरामनवमीच्या दिवशी अनेक राज्यांत रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आली. हिंदूंची आस्था व श्रद्धा असलेल्या श्रीरामाच्या धार्मिक
उत्सवांवर झालेले भीषण आक्रमण अत्यंत गंभीर आहे. ही आक्रमणे करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदन कणकवली तहसीलदार श्री रमेश पवार यांना हिंदु जनजागृती समिती च्या वतीने देण्यात आले. यावेळी श्री. नंदकुमार आरोलकर श्री श्रीधर मुसळे श्री रमेश सावंत श्री सूर्यकांत मालवणकर उपस्थित होते.

Article image

निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर आता कुठे श्रीराम मंदिराची पायाभरणी चालू आहे, असे असतांना धर्मांधांनी रामनवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर देशभरात आक्रमणे करून हिंदु समाजाला आणि सरकारला एक संदेश दिला आहे, असेच दिसते.

मुंबईत मानखुर्द आणि मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीला धर्मांध सामाजिक घटकांनी विरोध करत हिंदूंना मारहाण केली.

गुजरातमध्ये आनंद, हिंमतनगर, माहुवा, खंभात, सकरपुरा अन् द्वारका येथे रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक
झाली.
कर्नाटकमध्ये कोलार आणि मुलबागल याठिकाणीही रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमणे करण्यात आली. छोट्याशा गोव्यातही वास्को शहरात प्रथमच रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेकीची घटना घडली.
मध्य प्रदेशमधील खरगोन आणि सेंधवा, राजस्थानमधील करौली, बंगालमधील हावडा आणि झारखंड राज्यातही धर्मांध सामाजिक घटकांकडून रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण करण्यात आले. देहलीतील जेएनयूमध्येही श्रीरामनवमीनिमित्त पूजेचे आयोजन केल्याने हिंसक घटना घडली. ज्या ‘जेएनयू’त महिषासुर जयंती साजरी केलेली चालते; मात्र श्रीरामनवमी साजरी केलेली चालत नाही, हे देशाचे दुर्दैव आहे.
दगडफेकीसह तलवारी घेऊन हिंसक आक्रमण; वाहने आणि घरे पेटवणे; सार्वजनिक संपत्तीची हानी करणे आदी सर्व घटना गंभीर आहेत. श्रीरामनवमीच्या दिवशी झालेले आक्रमण हे एक सुनियोजित षड़यंत्र असून एकाच वेळी इतक्या ठिकाणी हिंसक घटना कशा घडल्या ? यामागे कोणाचा हात आहे ? धार्मिक
उत्सवांना लक्ष्य का केले जात आहे ? या सर्व घटनांची राष्ट्रीय स्तरावर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई
करावी, अशी मागणी आम्ही करत आहोत. तसेच यापुढे अशा घटना होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असेही हिंदू जनजागरण समितीने निवेदनात स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स