ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अणाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..!

अणाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..!

प्रकाशन: 14 Apr 2022 04:40 PM
वाचन संख्या 42

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या भव्य समाजमंदिराचे झाले उद्घाटन..

कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अणाव ग्रामपंचायत व अणाव बौद्ध उन्नती मंडळ यांच्या वतीने आज अणाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून १० लाख रु खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य समाजमंदिराचे उद्घाटन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. समाज मंदिरासाठी निधी मंजूर केल्याबद्दल समाज बांधवांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ध्वजारोहण कऱण्यात आले.

Article image


यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मूलमंत्र दिला.तो जोपासला पाहिजे. त्यांनी जी शिकवण आपल्याला दिली ती आपण आचारणात आणली पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्य घटना जगभर अभ्यासली जात आहे. सगळ्या समाजातील नागरिकांना सामान अधिकार त्यांनी मिळवून दिला. जगभर त्यांचे आदर्श घेतले जातात.तळागाळातील लोकांपर्यत त्यांचे विचार पोहोचले आहेत. मात्र काही जातीयवादी पक्ष झाले आहेत ते आपल्या राज्य घटनेत बदल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु राज्य घटनेत बदल करणे त्यांना शकय होणार नाही.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधी जात-पात बघितली नाही. त्यांच्या शिकवणी नुसार समाजातील रंजलेल्या गांजलेल्याना मदत करण्याचे काम शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मी व माझे सहकारी करत आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात साजरी केली जाते. परंतु ग्रामीण भागातील लोक देखील मुख्य प्रवाहात येण्यासाठी ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

       यावेळी  शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जि. प. सदस्य नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,  कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,माजी उपसभापती जयभारत पालव,आपा मांजरेकर, नारायण मांजरेकर, बाळू पालव, छोटू पारकर, अमित भोगले, सावळाराम अणावकर, गुरुप्रसाद  दळवी, अविनाश अणावकर, शिवराम अणावकर, प्रल्हाद  अणावकर,स्वप्नील जाधव, संगीता  अणावकर,छाया  अणावकर, सुजाता अणावकर, विनायक अणावकर, सुप्रिया अणावकर, सावळाराम धुरी, संदीप परब, विकास  अणावकर,  गजानन कुलकर्णी, समीर आंगणे, ममता पालव, सुरेश जाधव, सुनील कुलकर्णी आदींसह  बौद्ध उन्नती मंडळाचे कार्यकर्ते व  अणाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स