विल्यम फर्नांडिस यांची सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती…
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई येथे स्थायिक असलेले श्री विल्यम फर्नांडिस यांची सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळाचे सरचिटणीस म्हणून नुकतीच एक मताने निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्हा ख्रिश्चन विकास मंडळ हे सिंधुदुर्गातील सुमारे 50 हजार ख्रिश्चन लोकांच्या हितासाठी गेली तीन दशके कार्यरत आहे. हे मंडळ समाज प्रबोधनासाठी ‘नव किरण’ नावाचे नाताळ विशेषांक सुद्धा मोफत प्रकाशित करते. विल्यम फर्नांडिस यांचे मसुरे गावा सहित मुंबई येथे सामाजिक कला क्रीडा आदी क्षेत्रात मोलाचे सहकार्य असते. फर्नांडिस यांच्याकडे अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अनेक युवकांना त्यांनी मुंबईमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.यावेळी बोलताना विल्यम फर्नांडीस म्हणाले मिळालेल्या पदाचा उपयोग समाजातील सर्व स्तरातील लोकांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी करणार आहे.
श्री विल्यम फर्नांडिस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)