ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आता भारनियमनाचे 'फायर' नाही…तर मिळाले सुरळीत वीज पुरवठ्याचे 'फ्लाॅवर….!'

आता भारनियमनाचे 'फायर' नाही…तर मिळाले सुरळीत वीज पुरवठ्याचे 'फ्लाॅवर….!'

प्रकाशन: 07 Apr 2022 10:04 PM
वाचन संख्या 87

हळवल वागदे ग्रामस्थांच्या मागणीला मिळाला महावितरणच्या निर्णयाचा सुखद गारवा..!

कणकवली | प्रतिनिधी : सकाळी ५ ते दुपारी २ व सायंकाळी ७ ते रात्री १२ यावेळेत भारनियमन करण्याचा निर्णय महावितरण विभागाने घेतल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. गर्मीच्या दिवसात हा निर्णय घेतल्याने हळवल व वागदे ग्रामस्थानी आक्रमक होत महावितरण कार्यालयावर धडक दिली होती. अधिकाऱ्यांनी आम्हाला भेटावे अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. पोलीस यंत्रणेने मध्यस्थी करत या प्रकरणावर तोडगा काढून ग्रामस्थांना शांत राहण्यास सांगितले अखेर महावितरण उपभियंता श्री बगडे यांनी आक्रमक ग्रामस्थांना भेट देत भारनियमन होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असून यावर लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले. त्यानंतर उपस्थित ग्रामस्थांनी श्री बगडे यांचे आभार मानत महावितरण विभागाला लागणारी सर्वोत्तपरी मदत आपण करू मात्र भारनियमन करू नका अशी विनंती केली. अखेर ग्रामस्थांच्या विनंतीला दाद देत उपभियंत्यांनी भारनियमन होणार नाही असा शब्द दिला.
यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स