<em>गाबीत समाज देवगडच्या वतीने नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सत्कार</em>
चिंदर | विवेक परब : देवगड तालुक्यामध्ये गाबीत समाजाची वस्ती मोठयाप्रमाणावर असून यावर्षी नगरपंचायतीच्या निवडणुकीत समाजाचे ४ नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्षा म्हणून श्रीमती साक्षी प्रभू या विराजमान झाल्या हे गाबीत समाजाला भूषणावह असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय गाबीत समाजाचे राष्ट्रीय संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांनी सत्कारप्रसंगी बोलताना केले.
गाबीत समाज देवगडतर्फे संस्थेच्या कार्यालयामध्ये गाबीत समाजातील नवनिर्वाचित ४ नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला . हे चारही नगरसेवक शिवसेना या पक्षाचे आहेत.
यावेळी नगराध्यक्षा सौ. साक्षी प्रभू, यांचा सत्कार संस्थेच्या कार्यकारी सदस्या सौ. अश्विनी धुरी यांच्या हस्ते करण्यात आला. तर नगरसेवक श्री. निवृत्ती ऊर्फ बुवा तारी, श्री. नितीन बांदेकर व श्री. संतोष तारी यांचा सत्कार गाबीत समाजाचे राष्ट्रीय व जिल्हा संघटक श्री. चंद्रशेखर उपरकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. उपरकर म्हणाले कि देवगड ग्रामपंचायत असताना सुद्धा कांही वर्षे सरपंचपदावर गाबीत समाजातील श्री. बाळासाहेब ढोके यांनी चांगले काम केले. आता चारही नगरसेवकाना समाजसेवा करण्यासाठी चांगली संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी नगरविकास खात्याच्या आणि नगरपंचायतीच्या नियमांचा अभ्यास करून आपला ठसा जनमानसात उमटवावा अशी ईच्छा प्रगट केली. तसेच लवकरच देवगड -तुळशी नगर येथे गाबीत समाजाच्या जागेमध्ये “गाबीत समाज भवनाची”भव्य वास्तु उभारण्याचा संकल्प समाजाने केला आहे. त्यासाठी नगरसेवकानी आम्हाला सर्वप्रकारचे सहकार्य द्यावे अशी विनंतीही केली आहे.
यावेळी गाबीत समाज देवगडचे अध्यक्ष श्री. संजय पराडकर, उपाध्यक्ष लक्ष्मण तारी, सरचिटणीस संजय बांदेकर,धर्मराज जोशी, अजित टाककर,सुहास पराडकर, अश्विनी धुरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)