मेघनाद धुरी मित्रमंडळ व रोटरी क्लब ऑफ मालवणच्या संयुक्त विद्यमाने 'महाआरोग्य' शिबिराचे आयोजन..!
मालवण | सुयोग पंडित : मालवणचे रोटरीअन श्री. मेघनाद धुरी मित्रमंडळ आणि रोटरी क्लब ऑफ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 08 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी सकाळी 10:30 ते ते दुपारी 02:30 या कालावधीत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवणच्या सुप्रसिद्ध दैवज्ञ भवन येथे हे शिबीर आयोजीत करण्यात आले असून या आरोग्य तपासणीनंतरचे उपचारही मोफत केले जाणार असल्याचेही आयोजकांतर्फे व रोटरी क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष श्री उमेश सांगोडकर यांनी स्पष्ट केले आहे.
तरी 8 मे रोजी दैवज्ञ भवन येथे संपन्न होणार्या या शिबिराचा सर्वांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन मेघनाद धुरी मित्रमंडळ व रोटरी क्लब ऑफ मालवणने केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)