ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोणापाल आंब्याचेगाळू येथे स्थानिक विकास निधीतून संरक्षक भिंतीचे भूमिपूजन....!

रोणापाल आंब्याचेगाळू येथे स्थानिक विकास निधीतून संरक्षक भिंतीचे भूमिपूजन....!

प्रकाशन: 06 Apr 2022 05:53 PM
वाचन संख्या 53

बांदा | राकेश परब :रोणापाल आंब्याचे गाळू येथे जाणाऱ्या रस्त्यावर श्री देव खडपकर ठिकाणी पावसाळ्यात संरक्षक भिंती अभावी स्थानिकांना पुराचा सामना करावा लागत होता. दोन वेळा मातीचा भरावही वाहून गेला. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीची दखल आम्ही घेतली आहे. रोणापाल गाव एकजुटीने आमच्यासोबत राहिल्यास गावात प्रत्येक विकासकामाला शिवसेनेच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ, अशी ग्वाही शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य रुपेश राऊळ यांनी दिली.

आंब्याचेगाळू येथील श्री देव खडपकर येथे आमदार दीपक केसरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून संरक्षक भिंतीचे भूमिपूजन करताना श्री.राऊळ बोलत होते. या वेळी पंचायत समिती माजी सदस्य बबन राणे, शिवसेना इन्सुली विभागप्रमुख फिलिप रॉड्रिग्स, शाखाप्रमुख मंगेश गावडे तसेच सचिन पालव, रघुवीर देऊलकर, शिवा नाईक व ग्रामस्थ तसेच मक्तेदार अभिषेक देऊलकर आदी उपस्थित होते.

Article image


विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून शिक्षणासाठी जावे लागते. तसेच बांदा बाजारपेठ गाठण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. दुचाकी, चारचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागते. येथून रहदारी असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची व एक जादा मोरी पाईपची आवश्यकता असल्याची बाब शाखाप्रमुख मंगेश गावडे यांनी तालुका प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली.
रोणापाल गाव पूर्णपणे आमच्या सोबत राहिल्यास गावाचा विकास निश्चित आहे असे सांगत सदर संरक्षक भिंतीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजन परब यांनीही पाठपुरावा केला असल्याचे बबन राणे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश गावडे यांनी तर आभार बबन राणे यांनी मानले

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स