पळसंब मध्ये शेअर मार्केट सेमिनारचे आयोजन..!
शेअर मार्केटची प्राथमिक ओळख हा उद्देश..
चिंदर | विवेक परब : मालवण तालुक्यातील पळसंब येथे गुरुवार दिनांक 7 एप्रीलला श्री जयंतीदेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, पळसंब रजि. यांच्यावतीने ‘शेअर मार्केट आणि गुंतवणूक पर्याय’ या विषयावर प्राथमिक माहिती देणारे सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. पळसंब गावातील नागरिकांना या सेमिनारचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे विशेष सेमीनार श्री जयंती देवी मंदिर, पळसंब, गावठाण येथे
संध्याकाळी 6:45 वाजता सुरु होणार असून इच्छुकांनी पंधरा मिनिटे तिथे उपस्थिती दर्शविणे आवश्यक आहे.
सेमिनार शुल्क रुपये 50/_ असून सहभाग इच्छुकांनी नांव नोंदणी व अधिक माहिती गुरुवारी दुपारी 1 च्या आधी रोशन चिंचवलकर (8850978795) या क्रमांकाशी संपर्क साधून करायचे आवाहन करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)