ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
डिंगणे येथे कोसळली घरावर वीज..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

डिंगणे येथे कोसळली घरावर वीज..!

प्रकाशन: 06 Apr 2022 05:42 PM
वाचन संख्या 61

कुटुंबीय बचावले थोडक्यात..!

बांदा | राकेश परब : डिंगणे-आंबेडकरनगर येथील प्रिया रामदास डिंगणेकर यांच्या घरावर काल मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसात विजेचा लोळ कोसळल्याने घराच्या छपराचे व भिंतीचे नुकसान झाले. सुदैवाने डिंगणेकर कुटुंबीय यातून बचावले.

काल बांदा दशक्रोशीला मुसळधार अवकाळी पावसाचा फटका बसला. सायंकाळी उशिरा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. रात्री उशिरा डिंगणेकर कुटुंबियांच्या घरावर अचानक वीज कोसळली. वीज छपराच्या पत्र्यातून आत भिंतीवर कोसळली. त्यामुळे काही पत्र्यांचे नुकसान झाले तर भिंतीला दोन ठिकाणी तडे गेलेत. यामध्ये डिंगणेकर कुटुंबियांच्या घराचे नुकसान झाले.

वीज कोसळली त्यावेळी प्रिया डिंगणेकर या आपल्या मुलासह घरात होत्या. मात्र सुदैवाने दोघेही बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. सरपंच संजय डिंगणेकर, प्रदीप सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स