हळवलच्या शिवराई रवळनाथ सोसायटीवर सहकार समृद्धी पॅनेलचे निर्भेळ वर्चस्व…!
शिवराई रवळनाथ विविध कार्यकारी सेवा संघ संस्था मर्यादीत निवडणूक.
कणकवली | प्रतिनिधी : शिवराई रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संघ संस्था मर्यादित हळवल सोसायटीवर शिवसेना व गांव पॅनेल प्रणित सहकार समृद्धी पॅनेलचा एकतर्फी विजय झाला आहे. १२ जागांवरती विजय मिळवत सहकार समृद्धी पॅनलने सहकार संस्थेवर शिक्कामोर्तब केले आहे. विद्यमान चेअरमन राजेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवडणूक जिंकत समृद्धी पॅनेलने भाजप प्रणित पॅनलचा एकतर्फी पराभव केला आहे.
तब्बल ५१ वर्षांनी झालेल्या या निवडणुकीत राजू राणे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवत पुन्हा एकदा शिवराई रवळनाथ सोसायटीवर विजय मिळवला आहे. याबद्धल सर्व कार्यकर्त्यांनी उचलून घेत त्यांचं अभिनंदन केले.
विजयी उमेदवार राजू राणे, सुभाष राणे, जनार्दन डोबकर, संदीप गुरव ,राजश्री परब ,शर्वरी राणे ,प्रकाश घोगळे, विष्णू ठाकूर ,मिलिंद जाधव , गणेश राणे ,पंढरी राणे ,जयसिंग राणे, भोगजी राणे यांचे आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक, तेजस राणे यांनी हळवल येथे भेट देत राजू राणे व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)