<em>चिंदर भाजप कार्यालयात साजरा झाला भाजप स्थापना दिवस …..!</em>
चिंदर | विवेक परब : भारतीय जनता पार्टीचा ४२ वा स्थापना दिवस चिंदर भाजप कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संबोधित करताना भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले गेली ४२ वर्षे भाजपा कायम राष्ट्र निर्माण सेवेसाठी तत्पर कार्य करत आहे. जनकल्याण आणि देशकल्याण हे ध्येय सोबत घेऊनच भाजपाचा वटवृक्ष फुलत गेला आहे,वाढत गेला आहे. जनतेची साथ आणि विश्वास असाच सोबत घेऊन भाजपा हे कार्य अविरत पार पाडत राहील यात शंका नाही. आजच्या कार्यक्रमाला उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गांवकर, केदार गांवकर,मनोज हडकर, दिगंबर जाधव, देविका जाधव, विनोद लब्दे, शशी नाटेकर उपस्थित होते. चिंदरकर यांनी शुभदिनाबद्दल सर्व कार्यकर्त्यांना आणि भाजपाला साथ देणाऱ्या जनतेला ‘भाजपा स्थापना दिनाच्या’ हार्दिक शुभेच्छा दिल्या.!
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)