काव्यप्रेमींच्या काव्यलेखन स्पर्धेत सुरेंद्र(अण्णा)सकपाळ ठरले अव्वल..!
चिंदर | विवेक परब : काव्यप्रेमी शिक्षक मंच ( रजि.)सिंधुदुर्ग ही संस्था दरमहा मासिक काव्यलेखन स्पर्धा आयोजित करते. काव्यप्रेमी शिक्षक मंच या राज्यस्तरीय संस्थेची ही जिल्हा शाखा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रथितयश साहित्यिक बाबू घाडीगांवकर हे या संस्थेचे जिल्हाध्यक्ष आहेत. चारोळीलेखन, विषयावरून काव्यलेखन, विषयावरून लेख, काव्यलेखन कार्यशाळा, वृत्त- मात्रा- गझल कार्यशाळा, ऑनलाईन काव्योत्सव, मासिक काव्यलेखन स्पर्धा यांसारखे विविध साहित्यिक उपक्रम या संस्थेमार्फत नियमितपणे घेतले जातात. नुकत्याच पार पडलेल्या १२ व्या मासिक काव्यलेखन स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक कवींनी सहभाग घेतला होता. या काव्यलेखन स्पर्धेत सुरेंद्र(अण्णा ) सकपाळ यांच्या कवितेला प्रथम क्रमांक, पी. एस. कौलापुरे यांच्या कवितेस द्वितिय क्रमांक तर जयेश माधव यांच्या काव्यलेखनास तृतिय क्रमांक प्राप्त झाला. याशिवाय चारुशीला देऊलकर व मेधा पत्की यांनाही उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. रेडिओ पुणेरी आवाज १०७.८ एफ.एम. चे आर. जे. कैलास तथा कैलास नाईक यांनी या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम पाहिले. कैलास नाईक हे सुप्रसिद्ध कवी व गझलकार असून रेडीओ पुणेरी आवाज वर दर रविवारी प्रसारीत होणाऱ्या ‘ हा खेळ शब्दांचा’ या जगप्रसिद्ध व जगभरातील मराठी कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम ते सादर करतात. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व कवींचे काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, राज्यसचिव कालिदास चवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष बाबू घाडीगांवकर, मार्गदर्शक विजय जोशी आदींनी अभिनंदन केले आहे.
काव्यप्रेमी शिक्षक मंच (रजि.) सिंधुदुर्ग या साहित्यविषयक संस्थेच्या १२व्या मासिक काव्यलेखन स्पर्धेत सुरेंद्र(अण्णा)सकपाळ यांच्या काव्यलेखनास प्रथम क्रमांक मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)