शब्दांत बदल झाल्यास परिणामांना सामोरे जा : मातृत्व आधार फाऊंडेशन
आज चर्चा सकारात्मक परंतु अंमलबजावणी त्वरीत अपेक्षीत..!
शासकीय तंत्रनिकेतन मधील हेळसांड खपवून न घेण्याची फाऊंडेशन संस्थापक संतोष लुडबे व अध्यक्ष आप्पा चव्हाण यांनी दिली तंबी..!
तारकर्ली | सुरेश बापार्डेकर : मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला ‘ मातृत्व आधार फाऊंडेशन’ संस्थेच्या शिष्टमंडळाने धडक भेट दिली. शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची दखल घेण्यासाठी अचानक धडक देण्यात आली.
त्यावेळी शिष्टमंडळानी संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरश पाटील, प्रा. बडेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.संस्थेचे श्री. आप्पा चव्हाण, संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, मयु लुडबे, नारायण लुडबे आदींनी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्यावर विद्यार्थ्यांना भेडसावणाऱे पाण्याचा प्रश्न व फॅन दुरूस्ती संदर्भात प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा अधिकारी श्री. केरीपाळे, सुनील चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. पाणी पुरवठा कमी होण्याची कारण काय आहेत , यावर नगरपालिका व तंत्रनिकेतन या दोघांच्या अडचणी काय आहेत हे जाणून घेण्यात आले . या दोघात सुवर्णमध्य काढून आज पासून कोणत्याही परिस्थितीत मुलांना पाण्याचा पुरवठा कमी होणार नाही. या दृष्टीने सूचना करण्यात आला. नगरपालिका पाणीपुरवठा अधिकारी यांनी दोन दिवसांनी सोडला जाणारा पाणी पुरवठा, एक दिवस आड करून पाणी मुबलक सोडण्याचे मान्य केले. तर शासकीय तंत्रनिकेतनच्या वैयक्तिक मालकीच्या चार बोरींग्ज आहेत. परंतु ते सर्व सध्या बंद आहेत असे आढळले .
तौक्ते वादळा पडलेल्या टाक्या आजही उलट्याच पडून असलेल्या निदर्शनास आले.
फाऊंडेशनच्या सदस्यांनी यावर प्राचार्य श्री. पाटील यांचेवर जोरदार प्रश्नांची सरबत्ती केली. तसेच केवळ नगरपालिका पाणीपुरवठा हा विजेवर अवलंबून आहे. वीज नसेल तर दिरंगाई होऊ शकते. तरी तातडीने एकतरी बोरिंग चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर चालू करण्यात यावी न पेक्षा आंदोलन करण्यात येईल. तसेच या जिल्ह्याते पालकमंत्री याच तंत्रनिकेतन विभागाचे मंत्री आहेत., त्यांचाही लक्ष वेधण्यात येईल. तसेच पाईप लाईन अतिशय जुन्या झाल्या आहेत. त्या सुरळीत करण्यासाठी प्रयत्न व्हावा, तसेच मुलाची वसतीगृहे व वर्ग येथे फॅनची व्यवस्था नसल्याने आणि कडक उन्हाळा व परिक्षेचा कालावधी लक्षात घेऊन तातडीने उपाय योजना करण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. पाटील यांनी दोन वर्षे कोरोना मुळे सर्व विस्कळीत झाले होते, आणि या वर्षी एप्रिल, मे महिन्यात कॉलेज चालू ठेवण्याची वेळ आली. आणि त्यामुळे या अडचणीना सामना करावा लागत आहे. तरी आपल्या संस्थेच्या सूचनांचे पालन करून येत्या आठ दिवसात, एक तरी बोरिंग, व चालू नसलेले लाइट व फॅन चालू करण्याचे सांगितले. व सकारात्मक चर्चा झाली.
परंतु संस्थेचे अध्यक्ष आप्पा चव्हाण व संतोष लुडबे यांनी दिलेल्या शब्दात बदल झाल्यास गंभीर प्रसंगाला सामोरे जावे लागेल असा इशारा शासकीय तंत्रनिकेतन प्रशासनाला दिला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)