सप्टेंबर नंतरच शाळा सुरू होणार
मुंबई |ब्यूरो न्युज : राज्य टास्क फोर्स कडून मुंबईतील बैठकीत असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत की राज्यातील शाळा खुल्या करण्याचा निर्णय सप्टेंबर पर्यंत घेऊ नये.५० टक्के विद्यार्थी संख्येने शाळा सुरू करायचा असल्यास त्या सप्टेंबर नंतरच कराव्यात. तूर्तास गणेश चतुर्थी होईपर्यंत तरी ऑनलाईनच वर्ग सुरू ठेवावेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ.संजय ओक यांनी ही सूचना दिली असून बालरोग तज्ञ टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू यांनीही या सूचनेला पाठिंबा दिला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शाळा आठवड्यातून दोन दिवस सुरू करता येईल का असा प्रश्न केला असता रस्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स ची शिक्षण समितीसोबत १० ऑगस्टला चर्चा झाली व त्यामध्ये सप्टेंबर अखेरपर्यंत शाळा सुरू करू नये आणि ५० टक्के विद्यार्थी हा प्रयोग सप्टेंबर नंतरच करता येईल असे स्पष्ट केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)